महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनाचा अभाव असलेल्या कारभारामुळे शांती नगर भागातील कचरा व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाला आहे. नियमितपणे कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव कचरा घरातच साठवून ठेवावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्याचा धोका आणि नागरिकांचा संताप -
घरांमध्ये कचरा साचल्याने माशा, डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सवाल-
"एकीकडे महापालिका शहर स्वच्छतेच्या मोठ्या गप्पा मारते, मात्र प्रत्यक्षात आमच्या भागात घंटागाडी फिरकतही नाही. आम्ही कचरा कुठे टाकायचा? महापालिकेचे हे ब्रीदवाक्य फक्त जाहिरातींपुरतेच मर्यादित आहे का?" असा थेट सवाल शांती नगर भागातील संतप्त नागरिकांनी केला आहे.या गंभीर समस्येकडे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन शांती नगर परिसरात नियमित घंटागाडी सुरू करावी आणि नागरिकांची या नरकयातनेतून सुटका करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.


0 Comments