Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग | सोलापुरात नई जिंदगी पोलीस चौकीजवळ  तरुणाची हत्या

 


सोलापूर - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई जिंदगी पोलीस चौकी काही पाऊलाच्या अंतराजवळ  असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या खाली गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास  एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. उमर मौलाली बिराजदार वय 22 राहणार सिद्धेश्वर गांधी नगर मठाजवळ सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली की शांतीनगर येथील पाण्याच्या टाकी खाली एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असून तो काहीही हालचाल करत नसल्याचं दिसत असून काही अंतरावर एक दुचाकी वाहन पडलेली आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी आले. त्याला कोणत्यातरी धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला करून खून केल्याचे दिसून आले. 

घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराजदार, सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. काही महिन्यापूर्वी उमर बिराजदार यांचा साखरपुडा झाला होता. तर दोन-तीन महिन्यात  उमर चा लग्न असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments