Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर ब्रेकिंग । अक्कलकोट रोड एमआयडीसीत टॉवेल कारखान्याला आग

 

सोलापूर - येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील 'पीपी टॉवेल' या टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, घटनेची माहिती देऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याने स्थानिक नागरिक आणि कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आणि कारखानदारांनी तातडीने अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. मात्र, माहिती देऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होण्यास मोठा विलंब झाला असल्याची माहिती स्थ्यनिक नागरिकांनी दिली. वेळेवर बंब आले असते तर आगीची तीव्रता आणि नुकसान दोन्ही कमी करता आले असते," असा आरोप करत संतप्त नागरिकांनी केला आहे.ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणामुळे अद्याप अस्पष्ट आहे.

Post a Comment

0 Comments