Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नगरसेवक सावध ! मतदारांना त्रास दिलात तर मते गमावाल

 



सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आजी-माजी नगरसेवक तथा भावी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडून आल्यावर प्रभागामध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करणार कशाप्रकारे प्रभागामध्ये कामे करणार हे गल्लोगल्ली जाऊन भावी नगरसेवक प्रचार करत असताना दिसत आहे. तसेच नेतेमंडळी यांना बोलून कॉर्नर सभा देखील घेत आहे. प्रचाराच्या नादात मतदार राजाची शांतता भंग करू नका, वाहतुकीला अडथळा करू नका," असा स्पष्ट संदेश सुज्ञ मतदारांनी उमेदवारांना दिला आहे. 


प्रचार करताना संयम न पाळल्यास त्याचा थेट परिणाम मतांच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी कॉर्नर सभेसाठी मुख्य रस्ते अडवले जातात, ज्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. मतदारांच्या मते, वेळ आणि शांतता हिरावून घेणाऱ्या उमेदवाराला आम्ही आमचे मत का द्यावे?" असा प्रश्न आता मतदार राजा उपस्थित करत आहे.


मोठ्य - मोठ्या गाड्यांचा ताफा, शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीतून होणारे शक्तिप्रदर्शन आता मतदारांना आकर्षित करण्याऐवजी त्रस्त करत आहे. त्याऐवजी उमेदवाराने थेट नागरिकांच्या दारात जाऊन, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन संवाद साधवा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर सध्या 'शांतताप्रिय प्रचार' करण्याची मागणी जोर धरत आहे.त्यामुळे, उमेदवारांनी प्रचाराची रणनीती आखताना 'मतदार राजा' नाराज होणार नाही.याची विशेष खबरदारी घेणे भावी नगरसेवकांना अनिवार्य झाले आहे

.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या