सोलापूर - महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथील सहाय्यक अभियंताला 3 हजार रुपयांचे लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आला आहे. अमित विलासराव रेडेकर सहाय्यक अभियंता महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर असे लाच रक्कम स्वीकारलेल्या सहाय्यक अभियंताचे नाव आहे.
यातील तक्रारदार ग्राहक हे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरावर सोलार सिस्टम बसवण्याचे कामकाज करत आहे.जुळे सोलापुरात ग्राहकाच्या घरावर वीज बिलानुसार 3.5 किलो वॉट चे सोलार सिस्टम बसवण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. सदरचा अर्ज जुलै सोलापूर येथील महावितरण कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. ऑनलाइन पद्धतीने अर्जाला मंजुरी देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित यांनी एक किलो वॅट करिता एक हजार रुपये प्रमाणे तीन हजार रुपयाची मागणी करत असल्याची तक्रार सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथील सहाय्यक अभियंता अमित विलासराव रेडेकर यांना 3 हजार रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारली असून सहाय्यक अभियंता याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या