Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बातम्या देतोस काय? माढ्यात गुंडांची दहशत; भरचौकात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला!

 





टेंभुर्णी  - कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलाला गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देणे महागात पडले आहे. माढा तालुक्यातील अकोले येथे पोलीस पाटील मारुती रामचंद्र शिंदे (वय ४३) यांच्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक प्रेमी युगल पळून येऊन अकोले गावातील रोहित शिवाजी केचे याच्या घरी लपले होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी तपासासाठी स्थानिक पोलीस पाटील मारुती शिंदे यांची मदत घेतली होती. शिंदे यांनी पोलिसांना संबंधित घराचा पत्ता व ठिकाण दाखवले. आपला 'बातम्या' पोलिसांना का दिल्या, याच रागातून केचे कुटुंबीय शिंदे यांच्यावर टपून होते. यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.


भरदिवसा लोखंडी रॉडने हल्ला

सोमवारी दुपारी मारुती शिंदे हे पोलीस हवालदार सरडे यांच्यासोबत गस्तीवर होते. दुपारी जेवणासाठी थांबले असताना शिंदे एका किराणा दुकानासमोर फोनवर बोलत बसले होते. यावेळी रोहित शिवाजी केचे आणि शिवाजी केचे तिथे आले. "पोलिसांना आमची माहिती का दिली?" असा जाब विचारत हातातील लोखंडी रॉडने मारुती शिंदे यांच्या डोक्यावर आणि शरीरावर  वारकरून जीवघेणा हल्ला केले.


तणावाचे वातावरण आणि तपास

या भीषण हल्ल्यात मारुती शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे अकोले परिसरात घबराटीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी आरोपी रोहित केचे व शिवाजी केचे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या