सोलापूर - सोलापूरच्या रविवार पेठ येथील आरकाल हॉस्पिटलच्या पाठीमागील भागात भटके व मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुलांचे आरोग्य व जीविताला धोका निर्माण झाला असून, हल्ले व चावण्याच्या घटनांना वेग आला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकदा फोन करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली असली तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालक भयभीत झाले आहेत.कुत्र्यांचा बंदोबस्त ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत झाला नाही, तर नागरिक मोकाट कुत्रे पकडून महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर सोडून आंदोलन येईल असा इशारा प्रहार संघटने कडून देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या