सोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला ला पोहोचला आहे. उमेदवार रात्रीची झोप भूक तहान विसरून प्रचार करत असताना प्रभागांमध्ये दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनंत जाधव प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचार करत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रचारादरम्यान भोवळ आली. कार्यकर्त्यांनी लगेच उमेदवारास उपचारासाठी सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अनंत जाधव यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली होती. सध्या सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयामध्ये अनंत जाधव यांच्यावर उपचार सुरू आहे.

0 टिप्पण्या