सोलापूर - मुलांसोबत सेल्फी काढून पोलिस पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापूर शहरातील न्यू संतोष नगर पोलीस लाईन विजापूर रोड सोलापूर येथे घडली आहे. तर आत्महत्या केलेल्या महिलेचे पती सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे.
अश्विनी सिलिसिद्ध सलगर वय २९ राहणार न्यू संतोष नगर पोलीस लाईन विजापूर रोड सोलापूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस पत्नीचे नाव आहे. अश्विनी सलगर यांनी ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणाने हॉलमध्ये असलेल्या सिलिंग फॅनच्या लोखंडी काडीला साडीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवून विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. फुलारी यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू घोषित केले आहे.तर या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. मुलांसोबत शेवटचं सेल्फी काढून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

0 टिप्पण्या