सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर राजकारणात घडामोडी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एकनिष्ठ कार्यकर्ता सायरा शेख यांनी पक्षातील पदाचा व सदस्यत्वचा राजीनाना राष्ट्रवादी महिला काँग्रेस (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे दिला आहे.
सोलापूर शहरात गेल्या 20 वर्षापासून सायरा शेख पक्षात एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे कार्य केले. परंतु कार्य करत असताना पक्षातील वरिष्ठ नेते, स्थानिक नेते मंडळांनी सायरा शेख यांना नेहमीच डावलले.तसेच माझ्या सामाजिक कामामध्ये नेहमीच अडथळे पक्षातील लोकांनी आणलेले आहेत. तसेच स्थानिक नेते मंडळींनी पक्ष स्वताच्या मालकीचा असल्याप्रमाणे माझ्यासारख्या प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यावर नेहमीच अन्याय केलेला आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार करुन तिकिटांची विक्री करुन बाजार मांडण्यात आलेला आहे.
तसेच जशा निवडणुका संपतील तसे आलेले आयाराम परत आपआपल्या पक्षात जातील आणि राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या गंभीर बाबींचा देखील पक्षाने सखोल विचार करावा.शहरातील ब-याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत डावलुन आयत्या बंडखोर उमेदवारांना तिकिटे देण्यात आली. त्यामुळे शहरातील बरेच महत्वाचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत. तरी पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते शहरातील पदाधिका-यांचा विचार करत नसल्याने या मानसिकतेतुन मी पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असुन याचे मला अतिव दुःख होते. पण माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे सामाजिक व राजकीय खच्चीकरण होत असल्याने राजीनामा दिला आहे.

0 टिप्पण्या