सोलपूर - सोलापुरात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची प्रचारसभा झाली.यावेळी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली.अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं तू मारल्यासारखे करायचे आणि मी रडल्यासारखे करतो असे सुरु आहे. मात्र मुंबईत हे तिघे एकत्र मिळून मलई खातात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपविरोधात बोलले आणि नंतर संध्याकाळी फोन आला की लगेच नरमले. माझे नाव असदुद्दीन ओवैसी आहे,असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो असे आव्हान त्यांनी यावेळी अजित पवारांना दिले.
ते पुढे म्हणाले की संसदेत वक्फ बोर्ड कायदा होताना अजित पवारांनी त्याला पाठिंबा दिला होता. भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंग वाढले आहे. एका बीएसएफ जवानाच्या मुलाला पिंकी पिंकी म्हणून जीव मारले. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या त्यावर अजित पवार काही बोलले का? असेही यावेळी ओवैसी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प मोदींवर एवढे बोलतात, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ट्रम्प विरोधात बोलत नाहीत असेही ते म्हणाले.
पहा संपूर्ण व्हिडिओ 👇👇👇👇

0 टिप्पण्या