Ticker

6/recent/ticker-posts

वाहनधारकाला शिवीगाळ करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

 


​सोलापूर - सोलापूर शहर वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने वाहनधारकाला अरेरावी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिकांमधून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोलापूर शहरातील पाणी टाकी परिसराजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव पोलीस हवालदार खाडे असे असून, ते 'शहर वाहतूक शाखा (उत्तर)' येथे कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार खाडे हे एका वाहनधारकाशी अत्यंत उद्धटपणे बोलताना आणि त्याला शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहेत. नियमभंगाबाबत किंवा दंडात्मक कारवाईबाबत बोलत असताना पोलिसांकडून अशी अरेरावीची भाषा वापरल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी युवराज पवार यांना लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी युवराज पवार यांना पोलीस दलातून निलंबित केले.पोलीस हे रक्षक असून त्यांनी सामान्य नागरिकांशी सन्मानाने, सौजन्याने आणि संयमाने संवाद साधणे गरजेचे आहे.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments