सोलापूर - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त व शिवराळ टीकेवरून सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तीव्र निषेध नोंदवल्यानंतर, आता ठाकरे गटाचे शिवसैनिक खासदार राऊत यांच्या समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत.
भाजपच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून दुग्धाभिषेक-
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते, त्या जागेचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. तसेच खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रताप चव्हाण यांचे थेट विधान-
संजय राऊत हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या नादाला लागू नका. एवढेच नाही तर सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याही नादाला लागण्याचा प्रयत्न करू नका. पालकमंत्र्यांनी बालाजी सरोवर हॉटेलमध्ये बसून काय धंदे चालतात आणि सोलापुरात काय 'लफडे' सुरू आहेत, हे आधी सांगावे. आरक्षित जागा विकून हजारो कोटी रुपये कमवण्याचे धंदे पालकमंत्र्यांनी तातडीने बंद करावेत; अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर बंद पाडून तुमच्याविरोधात तीव्र जनआंदोलन उभे करू."पुढे बोलताना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले, "संजय राऊत जे बोलले ती महाराष्ट्राची भाषा आहे, त्यात काही वेगळे किंवा चुकीचे नाही. राऊत साहेब तर फक्त 'येड**' म्हणाले; पण मी तर जयकुमार गोरेंना थेट 'लिंगपिसाट' म्हणतो!आता या वक्तव्यावर जयकुमार गोरे यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आता पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देतात,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापुरात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष येत्या दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

0 Comments