Ticker

6/recent/ticker-posts

मंत्रिमंडळ हे मंत्रालय की दरोडेखोरांची टोळी? संजय राऊतांनी गोऱ्हेचा तो फोटो ट्विट करत केला सवाल

 


​राज्यातील राजकारण पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ट्विटरवरून अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ हे मंत्रालय आहे की दरोडेखोरांची टोळी?" असा घणाघाती प्रश्न उपस्थित करत राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली.​दरम्यान, संजय राऊतांच्या या जहरी टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महायुतीचे नेते काय प्रत्युत्तर देतात,हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.पण या राजकीय कलगीतुऱ्यामुळे येत्या दिवसांत सोलापूरसह राज्यातील राजकारण अधिक तापणार असल्याचे चिन्ह दिसते.







Post a Comment

0 Comments