Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर ब्रेकिंग | आज अर्ज भरणार सोलापूरचे भावी महापौर

 




सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेत भाजपने ८७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी पक्षांतर्गत हालचाली तीव्र झाल्या आहेत.भाजपने महापौर-उपमहापौर निवडीसाठी स्पष्ट पक्षादेश जारी केला असून, पक्षाची परवानगीशिवाय कोणताही उमेदवारी अर्ज भरू नये किंवा सूचक-अनुमोदक म्हणून सहभागी होऊ नये, अशा सूचना सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत.


आमदार सुभाष देशमुख गटाचे एकही नाव महापौर किंवा उपमहापौर पदाच्या चर्चेत नाही. पक्षातील विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे अशा तीन गटांत शह-कटशह चालू असून, सुभाष देशमुख गट मागे पडल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या