सोलापूर - सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 1 महिला जखमी झाल्याची माहिती आहे. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ हा अपघात झाला आहे.नवेलहुन अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातलाय. शनिवारी रात्री 12 च्या सुमारास वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार अदाळल्याने हा अपघात झालाय. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने MH-46 Z 4536 रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार अदाळल्याने हा अपघात झालाय.मोहोळ पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेले होते.

0 टिप्पण्या