Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरकरांनो लक्ष द्या! 'एचएसआरपी' नसेल तर RTO ची 'ही' महत्त्वाची कामे होणार ठप्प!

 


सोलापूर - दिलेली मुदत संपूनही वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) न बसवणाऱ्या आणि नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांवर सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कारवाईचा बडगा उगारला आहे. जुलै महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ७७० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ७ लाख ७९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाईची पार्श्वभूमी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनधारकांना यासाठी ३० जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती.

मुदत संपल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार, सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने १ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवली.कारवाई झालेली एकूण वाहने ७७० असून एकूण  ७  लाख ७ ९  हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 8८ ०  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एचएसआरपी' नसल्यास ऑनलाइन सेवांवर निर्बंध-

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना परिवहन विभागाच्या (RTO) विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही.वाहनाची मालकी हस्तांतरित करणे (Transfer of Ownership),पत्ता बदलणे,वाहनावरील कर्जाची नोंद चढवणे किंवा कमी करणे (Hypothecation),वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration),परवान्याचे (Permit) नूतनीकरण तसेच इडतडी कामे होणार नाही.

वाहनधारकांना आवाहन आणि इशारा-

पुढील दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी वाहनधारकांनी अधिकृत विक्रेत्यामार्फत तातडीने आपल्या वाहनांवर HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे. तसेच, आगामी काळात ही विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments